Saturday, January 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स - मनोगत

मनोगत
व्हॅन गॉग, तूलुज लोत्रेक आणि पॉल गोगँ हे पोस्ट इंप्रेशनिस्ट कालखंडतील तीन चित्रकार समकालीन तर होतेच शिवाय त्यांचा एकमेकांशी परिचयही होता. तिघेही चित्रकार म्हणून थोर होतेच शिवाय त्यांची जीवनकहाणी ही विलक्षण म्हणता येईल अशी आहे. या तिन्ही चित्रकारांना असामान्य प्रतिभेचं देणं लाभलं होतं. तिघांच्याही आयुष्यात संघर्ष, उपेक्षा आणि अवहेलना आहेत. पण या सर्वांचा सामना करत आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. पण त्यासाठी त्यांनी काय किंमत दिली याची प्रचिती त्यांची जीवनकहाणी वाचल्या शिवाय येत नाही. व्हॅन गॉगच्या जीवनावर आधारीत अर्विंग स्टोनच्या लस्ट फॉर लाईफचा अनुवाद माधूरी पुरंदरेंनी फार पूर्वीच केला आहे. तुलूज लोत्रेकच्या जीवनावर आधारीत पिएरे ल मूरच्या मुलँ रूजचा मी केलेला अनुवाद २०११ मध्ये प्रसिद्ध होताच मी पॉल गोगँच्या जीवनावर आधारीत सॉमरसेट मॉमच्या मून अँड सिक्सपेन्सचा अनुवाद करण्याचा दुसरा संकल्प सोडला होता.
गोगँची रंगांची हाताळणी आणि त्याची सिंथेटीस्ट या नावाने प्रसिद्ध झालेली शैली इंप्रेशनिस्ट चित्रकारांपेक्षा अगदी वेगळी होती. ताहिती बेटांवर तैलरंगांच्या उपलब्ध न झाल्यामुळे गोगँने शिल्पकला, लाकडावरचे कोरीवकाम आणि सेरॅमिक्स ही माध्यमेही कॅनव्हास एवढ्याच ताकदीने हाताळली आहेत. त्याने आपली कला व जीवना विषयी भूमिका वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून ठाम पणे मांडली. आपल्या ताहितीमधील वास्तव्यात तेथील फ्रेंच अधिकारी आणि चर्च यांच्या रोषाची पर्वा न करता त्याने तेथील आदिवासींची बाजू मांडली. सिंबॉलिस्ट चित्रकारांचा तो एक आदर्श होता. प्रिमीटीव्हिजन आणि खेड्याकडे वळा अशा चळवळींनी गोगँकडून प्रेरणा घेतली आहे. नवचित्रकलेचे उद्गाते पाब्लो पिकासो आणि हेन्री मातिस यांच्यावर गोगँचा प्रभाव होता.
मून अँड सिक्सपेन्स ही मॉमची सर्वात गाजलेली आणि त्याची स्वत:चीही आवडती कादंबरी आहे. ही कादंबरी मॉमच्या ‘मनुष्य त्याच्या विकारांचा आणि नियतीचा बळी असतो’ या लाडक्या संकल्पनेवर बेतलेली आहे. पण मॉमने कादंबरीच्या कथानकात पॉल गोगँच्या जीवनकहाणीपासून बरीच फारकत घेतल्याने त्याने कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव बदलले आहे. मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीत कित्येक ठिकाणी फ्रेंच भाषेतील संवाद तसेच ठेवले आहेत. अनुवाद करताना त्यांचा उच्चार आणि अर्थासाठी गुगल ट्रान्सलिटरची मदत घेतली आहे. तसेच कादंबरी चित्रकाराच्या जीवनावर असल्यामुळे प्रसंगोपात पॉल गागँची चित्रे उध्दृत करण्याचा मानस ही चित्रे विकीपिडीयावर पब्लिक डोमेनमधे उपलब्ध असल्यामुळे शक्य झाले.
अनुवाद करण्याचा संकव्प माझ्या हातून लगेच पूरा झाला तरी प्रसिद्धीचा योग काही जूळून येत नव्हता. शेवटी माझ्या ब्लॉगवर क्रमश: प्रसिद्ध करावा असा विचार आहे. पूर्वी एपीएस वापरून केलेले काम इ-आवृत्तीसाठी युनिकोडमध्ये रूपांतरीत करण्याचे काम मुळ अनुवादा एवढे कठीण नसले तरी चिकाटीची मागणी करणारे आहे. रूपांतर करताना काही दोष राहून गेले असल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर माझ्या आनंदात भर पडेल आणि ब्लॉग नियमीत चालू ठेवण्यासाठी उत्साहाचे बळ मिळेल.

जयंत गुणे

११ जानेवारी २०१८, कार्लसबाद, सॅन दिआगो.

12 comments:

  1. सुरवात उत्कंठावर्धक आहे. तेव्हा जोमाने होऊन जाऊ द्या.

    ReplyDelete
  2. Jayant plese go ahead you are on right track, dont leave inbetween. All the best.

    Arun

    ReplyDelete
  3. chitrakaechya sandarbhaat mi konatihi pratikriyaa dene mhanaje shuddh khotepanaa aahe pan konatyaahee kshetraat naav kelelyaa vyakteematvaanvishayee pudhachyaa pidhilaa kalane hi ek saanskrutik garaj aahe aani tee tahaan bhaagavanyaache kaam aapan karataa aahaat hi aanandaachee baab aahe.

    ReplyDelete
  4. फार छान,all the.best

    ReplyDelete
  5. फार छान,all the.best

    ReplyDelete
  6. ... अनुवादात फार कौशल्य पणाला लागते
    नाशिकचे द्राक्ष घेवून आपल्या मातीच्या मडक्यात तीच फ्रेंच वाइन ची धुंदी व चव आपण या brewing madhye आणण्याच्या तरतरीत शुभेच्छा ... कोठे शब्दा वेडावाकडा असल्यास माफ करून भावना समजून घ्यावी

    ReplyDelete
    Replies
    1. तुमची मातीच्या भांड्यातील वाईन चाखायला मजा येईल। मून अँड सिक्सपेन्स वाचताना सुध्दा तुम्हला तस्साच आनंद मिळो

      Delete
    2. अनुवादाची ती वाईन तेवढीच उत्कृष्टच व्हावी याची माझी जबाबदारी तुमच्या या कॉमेंट मुळे वाढली आहे

      Delete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. अरे वाह, हे फारच उत्तम काम झालेय. मूळ कादंबरी मी दोनदा वाचली आहे. तरी आपल्या मराठीत वाचायची उत्कंठा आहेच.यानिमित्ताने एक सांगावंसं वाटतं. पॉल गोगँ च्या जीवनावर अजून दोन कादंबऱ्या आहेत. १)एड गॉर्डन ची द फ्लेश पेंटर ( ही मी वाचली आहे ) २) गोल्ड ऑफ देअर बॉडीज -Charls Gorham. यावर याच नावाचा सिनेमाही आहे.
    तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! 👍💐

    ReplyDelete
  10. गोल्ड ऑफ देअर बॉडीज मी वाचली आहे। पॉल गोगीनच्या आयुष्याशी ती जास्त प्रामाणिक आहे। पण कादंबरी म्हणून मून जास्त चांगली वाटली

    ReplyDelete